नगर – ९७ वर्षांची उत्कृष्ट परंपरा आणि लौकिक असलेल्या अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा कारभार आणि संस्थेकडून सभासदांसाठी राबविले जाणारे उपक्रम जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांसाठी पथदर्शक असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी काढले.
संस्थेच्या संचालक मंडळाने आणि सर्व सभासदांनी संस्थेचा लौकिक या पुढील काळात आणखी वाढवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि ९) नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. संजय कळमकर हे उपस्थित होते. प्रारंभी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देवून करण्यात आला.
यावेळी डॉ. कळमकर यांनी आपल्या विनोदी शैलीत उपस्थितांना मनमुराद हसवत सध्याच्या सामाजिक प्रश्नांवर तसेच सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विनोदी शैलीत चिमटे काढले. मुलांवर खरे संस्कार कुटुंबातच होतात, त्यामुळे उद्याचे चांगले नागरिक घडविण्यासाठी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी पालकांनी वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
सभेचे प्रास्ताविक चेअरमन योगेंद्र पालवे यांनी करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभेच्या विषय पत्रिकेवर चर्चेला सुरुवात झाल्या नंतर सर्व उपस्थित सभासदांना बोलण्याची संधी देत त्यांचे म्हणणे ऐकून घेत जो पर्यंत त्यांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा संचालक मंडळाने घडवून आणली. दुपारी १२ ला सुरु झालेली सभा ४.३० पर्यंत चालली.
या सभेत संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार पोटनियम दुरुस्ती, सभासद कर्ज मर्यादा १८ लाखापर्यंत वाढविणे, सभासद कुटुंब आधार योजनेत मयत सभासदांचे १५ लाखांपर्यतचे कर्ज माफ करण्याचा ठराव कायम करणे, यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या जागेवर कोणता प्रकल्प उभारायचा याबाबत दोन महिन्यात सर्व सभासदांची मते घेवून निर्णय घेण्याचे यावेळी ठरले.
यावेळी सभासद विकास साळुंके, अभय गट, प्रमोद झरेकर, संदीप अकोलकर, राधेशाम सपकाळे, विजय कोरडे, संभाजी आव्हाड, नितीन निर्मळ, आदिनाथ मोरे, सोमनाथ भिटे, संदीप मुखेकर, प्रवीण राऊत, किशोर फुलारी, विलास वाघ, मनोज चोभे, संजय बनसोडे, शिवहरी दराडे, कल्पना शिंदे, वंदना धनवटे, राजेंद्र म्हस्के, सागर आगरकर, अनुबा पालवे, अशोक घानमोडे, रवींद्र मांडे, कैलास भडके, मारुती फरताळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभासदांच्या प्रश्नांना चेअरमन योगेंद्र पालवे, संचालक संजय कडूस, कल्याण मुटकुळे, अरुण जोर्वेकर, कैलास डावरे, व्यवस्थापक राजेंद्र पवार आदींनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
सभेस व्हाईस चेअरमन डॉ. दिलीप डांगे, संचालक विलास शेळके, प्रशांत मोरे, विक्रम ससे, चंदकांत संसारे, इंजी. राजू दिघे, भाऊसाहेब चांदणे, ऋषीकेश बनकर, स्वप्नील शिंदे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, अर्जुन मंडलिक, श्रीमती ज्योती पवार, श्रीमती सुरेखा महारनुर, श्रीमती मनिषा साळवे, दीपक गोधडे, नितीन चोथवे, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे व कर्मचारी वृंद तसेच जिल्हाभरातून आलेले सभासद उपस्थित होते.