गणराज्य न्यूज ब्राम्हणी – परिसरातील जागृत देवस्थान बहीरोबा महाराजांचा यात्रा उत्सव १७ एप्रिल रोजी होत आहे.
१८ रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याची जोरदार पूर्वतयारी यात्रा उत्सव समितीकडून सुरू आहे. यात्रा उत्सव समितीच्या सदस्यांनी स्वतःहून कुस्ती मैदानाची स्वच्छता करत श्रमदान केले. कुस्ती आखाड्यातील लहान – मोठे दगड,मोठे गवत काढून घेतले. कुस्ती प्रेक्षकांना व्यवस्थित बसता याव यासाठी जेसीबीच्या माध्यमातून जागा स्वच्छता व लेवल सुरू आहे.
यावेळी समिती सदस्य सोसायटी चेअरमन सुरेश बानकर,व्हा.चेअरमन अनिल ठूबे, संचालक माणिक तारडे,भागवत देशमुख,दादासाहेब हापसे,माणिक गोरे, पत्रकार गणेश हापसे, महेंद्र हापसे, मनीष संकलेचा आदींनी श्रमदान केले.