गणराज्य न्यूज ब्राम्हणी : परिसरातील अध्यात्मिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व ह.भ.प अण्णा महाराज उर्फ बापूसाहेब भिमराज राजदेव (वय 71) यांच उपचारादरम्यान निधन झाले.
गत पंधरा दिवसापासून नगर मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पंचक्रोशीतअण्णा महाराज या नावाने ओळख असलेले बापूसाहेब भिमराज राजदेव यांचा ज्ञानेश्वरीचा मोठा अभ्यास होता.
आयुष्यभर आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अण्णा महाराजांनी अनेक सप्ताहात प्रवचनाच्या माध्यमातून हरिनामाचा जागर केला. वर्ष श्राद्ध, हरिनाम सप्ताह अन्य कार्यक्रमात कोणत्याही महाराजांचे कीर्तन असो कीर्तनादरम्यान प्रमाण देत असत.एवढा अभ्यास होता.
शांत, मितभासी, संयमी व अभ्यासु व्यक्तिमत्व आज निघून गेल्याने ब्राह्मणी परिसरातील अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राहुल व रेवणनाथ राजदेव यांचे ते वडील होत. प्राध्यापक त्रिंबक राजदेव,सुभाष राजदेव, अनिल राजदेव यांचे ते बधू होते.