गणेश हापसे – गणराज्य न्यूज ब्राम्हणी : चेडगाव परिसरातील पशुपालक संजय सुरेश शिंदे यांच्या गोठ्यात वीज पडून दोन मोठ्या गाईंचा जागेवर मृत्यू झाला.
संजय सुरेश शिंदे तरुण पशुपालकाचा गाईंचा मोठा गोठा आहे. रविवारी रात्री अचानक गोठ्यात वीज पडली. मोठ्या दुपत्या दोन गाई दगावल्या. सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
तरुण दूध उत्पादकांवर मोठ आर्थिक संकट कोसळले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला. पुढील कार्यवाही सुरू आहे. शासकीय रक्कम नुकसानीच्या तुलनेत एवढी मिळणार नाही. त्यासाठी ग्रामस्थांनी आता एक हात मदतीचा सुरू केला.
सहकारी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आर्थिक मदत सुरु आहे आपणही आपल्या पशुपालक तरुण सहकार्याला आर्थिक सहकार्य करून पाठबळ देऊया. असे आवाहन गणराज्य न्यूजच्या माध्यमातून आपणास करण्यात येत आहे.