ब्राम्हणी : सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दादासाहेब एकनाथ हापसे तर,व्हॉईस चेअरमनपदी श्रीकृष्ण अनंदा तेलोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहकार विभागाचे मुटकुळे यांच्या उपस्थित निवड प्रक्रिया पार पडली. मावळते चेअरमन सुरेश बानकर व व्हॉईस चेअरमन अनिल ठूबे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक मा.चेअरमन मा.सरपंच वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, मा.पोलीस पाटील जालिंदर हापसे, संस्थेचे संचालक माणिक तारडे,बाळासाहेब देशमुख, महेंद्र तांबे, अशोक नगरे, शिवाजी राजदेव, पंडित हा, मंजूलदास तेलोरे, प्रभाकर साठे,आप्पाजी वाकडे, बाळासाहेब शेळके, संस्थेचे सचिव अशोक आजबे आदी उपस्थित होते.
निवडी दरम्यान नेहमी प्रमाणे विरोधी दोन्ही संचालक अनुउपस्थित राहिले.तर, चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला सत्तेतील दोन्ही गट आज एकत्र दिसणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याच उत्तर तांबे गटातील सदस्यांच्या उपस्थितीने दिलं. ठरल्याप्रमाणे आम्ही सोसायटीत एकत्रितच आहोत.. असा सूचक इशारा जणू त्यांनी आज एकत्रित येऊन विरोधकांसह गैरसमज असणाऱ्यांना दिला. बानकर व तांबे सत्तेच्या राजकारणात एकत्रित आहेत. आजच्या निवडी दरम्यान पुन्हा एकदा स्पष्ट झाल.