गणराज्य न्यूज ब्राम्हणी – गं.भा चंद्रभागा हरिभाऊ हापसे (वय १००) यांच्या शताब्दी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुक्रवार ५ मे रोजी ब्राम्हणी गावात भव्य अश्व रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरम्यान या सोहळ्यानिमित्त हापसे वस्ती, केंदळ रोड, मुक्ताई डेअरी समोर प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर हैबती) यांचे किर्तन होणार आहे.यावेळी चंद्रभागा आजीची पेढेतुला करण्यात येणार आहे.
या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.बापूसाहेब हरिभाऊ हापसे, कृष्णा बापूसाहेब हापसे,सचिन बापूसाहेब हापसे व चि. नयन सचिन हापसे यांनी केले आहे.