Home राहुरी पोल्ट्री फार्मविरुद्ध उपोषण

पोल्ट्री फार्मविरुद्ध उपोषण

83
0

 

सोनई : जवळील बेल्हेकरवाडी येथे पोल्ट्रीफार्मचा गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने ग्रामस्थ बुधवार 24 पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत.उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

बेल्हेकरवाडी येथील सदर पोल्ट्री फार्म मुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून माशांचा वावर वाढला असून पक्षांच्या आवाजाचा त्रास होत असून या पोल्ट्री फार्म मधील पक्षी आणि पक्षांची पिसे जाळली जातात त्यामुळे वातावरणात धूर निर्माण होऊन प्रदूषण होत आहे व त्या धुराचा दुर्गंध परिसरामध्ये पसरत आहे. त्यामुळे मानवी जीवास धोका निर्माण झालेला आहे. सदरील पोल्ट्री फार्म विरोधात योग्य ती कारवाई होण्यासाठी २७ मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. तरी या पोल्ट्री फार्मवर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने बुधवार दिनांक २४ पासून  वीर हनुमान मंदिर, बेल्हेकरवाडी येथे ग्रामस्थ आमरण उपोषणास बसलेले आहेत. या उपोषणाचे निवेदन अहमदनगर जिल्हाधिकारी, नेवासा तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, गटविकास अधिकारी, नेवासा प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ नाशिक, बेल्हेकर वाडी तलाठी ऑफिस व ग्रामपंचायत, पोलीस अधीक्षक अहमदनगर, सोनई पोलीस ठाणे यांना देण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here