Home Uncategorized भीषण अपघात

भीषण अपघात

74
0

ब्राह्मणीत भीषण अपघात
एक ठार दोन जखमी
ब्राम्हणी : राहुरी शनिशिंगणापूर महामार्गावर ब्राह्मणी बस स्टँड लगत चेडगाव फाट्यावर दुचाकी व टँकरचा अपघात झाला. दरम्यान दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला.तर,दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दुचाकीस्वार सोनईकडून राहुरीकडे जात असताना दुधाचा टँकर चेडगावकडे वळत होता. यावेळी दुचाकी व टँकरची जोराची धडक झाली. दुचाकी वरील चालक थेट टँकरच्या टायरखाली गेला. घटनेची माहिती समजताच बस स्टँड परिसरातील व्यावसायिक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती समजतात राहुरी पोलीस ठाण्याची पोलीस कर्मचारी दिनकर चव्हाण व गणेश लिपने घटनास्थळी दाखल झाले. मयत व्यक्तीचे नाव कृष्णा विजय कोळेकर रा. नांदगाव असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Previous articleअभिष्टचिंतन सोहळा
Next articleकिर्तन महोत्सव
गणराज्य न्यूज संपर्क: [email protected] मोबाईल: 9730377511

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here