गणराज्य न्यूज ब्राम्हणी : आपली गरज भागविण्यासाठी प्रपच आहे.तर
मनाला सुखी ठेवायचं असेल तर परमार्थ महत्वाचा आहे.परमार्थ महाधन आहे.आध्यात्मिक जीवन प्रत्येकाने जगावे…असे प्रतिपादन हभप दादा महाराज वायसळ यांनी केले.
आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आजपासून श्री क्षेत्र ब्राह्मणीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला.पहिल्या दिवसाची किर्तन सेवा पार पडली.
आजचे संत पूजन भाऊसाहेब नामदेव वने यांची होती.सकाळी विलास अबादास राजदेव यांचा आल्पोहार होता.तर , दुपारच अन्नदान सागर सुनिल चंगेडे यांच्याकडे होते. तर किर्तन झाल्यानंतर जगन्नाथ चौधरी, साहेबराव चौधरी हॉटेल राधाकृष्ण परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
पहिल्याच दिवसाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली.