ब्राम्हणी : देवगड संस्थांचे उत्तराधिकारी ह.भ.प प्रकाशनंदगिरी महाराज यांची भवार परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त ब्राम्हणीत आज गुरुवर्य प्रकाशनंदगिरी महाराज यांची काल्याच्या कीर्तनाची सेवा पार पडली.दरम्यान आजच्या काल्याच्या कीर्तन संतसेवेचे यजमान सेवानिवृत्त मेजर बहिरनाथ भवार व बाबासाहेब भवार परिवाराने महाराजांच स्वागत केल.अर्ध्या तासाच्या भेटीदरम्यान गावातील भजनी मंडळ वारकरी, विविध संस्थेचे पदाधिकारी सप्ताह समिती संयोजक आदी उपस्थित होते. उपस्थित प्रत्येकाने महाराजांशी विविध विषयावर संवाद साधला. अनेकांनी आपली ओळख करून दिली.