गणराज्य ब्राम्हणी : कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्या बुधवार दि.१७ मे रोजी सकाळी ११ वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.
तरी परिसरातील होतकरू रोजगार युवा तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या शुभहस्ते शिबिराच उद्घाटन होणार आहे. यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार,तांदूळवाडीच्या सरपंच गायत्री अमोल पेरणे, युवा उद्योजक विराज धसाल, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे व सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे निशांत सूर्यवंशी आदि उपस्थित राहणार आहेत.
युवक तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.