Home महाराष्ट्र संस्थेच्या इतिहासात प्रथम महिला चेअरमन

संस्थेच्या इतिहासात प्रथम महिला चेअरमन

60
0

राहुरी तालुक्यातील केंदळ बु. विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी उषाताई ज्ञानदेव मांगुडे तर उपाध्यक्ष राजू रमेश कैतके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या निवड बैठकीत अध्यक्ष पदासाठी सौ. मांगुडे यांच्या नावाची सुचना अरूणराव डोंगरे यांनी मांडली. त्यास अनिल तारडे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्ष पदासाठी कैतके यांच्या नावाची सुचना श्रीकृष्ण भोसले यांनी मांडली. त्यास अमोल तारडे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही उमेद्वारांवर सर्व संचालकांचे एकमत होऊन त्यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जी. एम. मुसळे यांनी काम पाहिले. त्यांना मुख्य सचिव लक्ष्मण गोसावी सहकार्य केले. केंदळ सेवा संस्थेच्या इतिहासात प्रथमच महिलेची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने सर्वत्र या निवडीचे स्वागत होत आहे. यावेळी मावळते अध्यक्ष- उपाध्यक्ष व नुतन अध्यक्ष- उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन पदाधिकार्‍यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी आसाराम तारडे, गोरक्षनाथ तारडे, श्रीधर भोसले, बापूसाहेब मांगुडे, सदाशिव तारडे, प्रमोद तारडे, बापूसाहेब तारडे, मधुकर तारडे, नामदेव तारडे, भागवत तारडे, ज्योती मांगुडे, लंका भुसे, कैलास मांगुडे, संजय तारडे, सतीश भोसले, ज्ञानदेव मांगुडे, ज्ञानदेव कैतके, किशोर कैतके, भैया पठाण आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.राहुरी तालुक्यातील केंदळ बु. विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी उषाताई ज्ञानदेव मांगुडे तर उपाध्यक्ष राजू रमेश कैतके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या निवड बैठकीत अध्यक्ष पदासाठी सौ. मांगुडे यांच्या नावाची सुचना अरूणराव डोंगरे यांनी मांडली. त्यास अनिल तारडे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्ष पदासाठी कैतके यांच्या नावाची सुचना श्रीकृष्ण भोसले यांनी मांडली. त्यास अमोल तारडे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही उमेद्वारांवर सर्व संचालकांचे एकमत होऊन त्यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जी. एम. मुसळे यांनी काम पाहिले. त्यांना मुख्य सचिव लक्ष्मण गोसावी सहकार्य केले. केंदळ सेवा संस्थेच्या इतिहासात प्रथमच महिलेची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने सर्वत्र या निवडीचे स्वागत होत आहे. यावेळी मावळते अध्यक्ष- उपाध्यक्ष व नुतन अध्यक्ष- उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन पदाधिकार्‍यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी आसाराम तारडे, गोरक्षनाथ तारडे, श्रीधर भोसले, बापूसाहेब मांगुडे, सदाशिव तारडे, प्रमोद तारडे, बापूसाहेब तारडे, मधुकर तारडे, नामदेव तारडे, भागवत तारडे, ज्योती मांगुडे, लंका भुसे, कैलास मांगुडे, संजय तारडे, सतीश भोसले, ज्ञानदेव मांगुडे, ज्ञानदेव कैतके, किशोर कैतके, भैया पठाण आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here