ब्राम्हणी : गावची ग्रामसभा आज ३१ मे रोजी सरपंच प्रकाश बानकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी म्हणून घाडगे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. तंटामुक्ती अध्यक्ष माणिक तारडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.त्याचे वाचन ग्राम विकास अधिकारी यांनी केले. दरम्यान सभेत नवीन तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य उमाकांत हापसे यांनी सुरेश पंढरीनाथ बानकर यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास लक्ष्मण नवाळे यांनी अनुदान दिले. नूतन अध्यक्ष सुरेश बानकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
ग्रामसभेच्या चर्चेत अधिकारी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. अजित मोकाटे यांनी दारूबंदीचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला. दारूबंदीच्या मुद्द्यावर सभा काही वेळ चांगलीच गाजली. माजी सरपंच बाळकृष्ण बानकर यांनी दारूबंदी गावाच्या हिताची आहे. विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेवून दारूबंदी करावी. यातून गावाचा निश्चित फायदा आहे. गावाचं नाव जिल्ह्यात तालुक्यात चांगला आहे. असे मत बाळकृष्ण बानकर यांनी व्यक्त केल.
नूतन तंटामुक्ती अध्यक्ष यांनी दारूबंदीसाठी लवकरच विशेष ग्रामसभा बोलू असे सांगितले. विशेष सभेला गावातील महिलांची संख्या लक्षणीय राहील.त्यावेळी आपण उभी बाटली आडवी बाटलीचा अंतिम निर्णय घेऊन गाव दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू असेदारूमुक्त. ब्राह्मणी ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामसेविका प्रमिला तरवडे व शोभा हापसे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ब्राह्मणी सोसायटीचे चेअरमन दादासाहेब हापसे,व्हा.चेअरमन श्रीकृष्ण श्रीकृष्ण तेलोरे,संचालक बाळासाहेब देशमुख शिवाजी राजदेव माणिक गोरे, प्रेमसुख बानकर, कृषी पर्यवेक्षक युगप्रिया उगले, वन विभागाचे कर्मचारी रायकर, तलाठी अंकुश सोनार, झेडपी शाळेचे शिक्षक आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पै दीपक हापसे,महेश हापसे यांनी चर्चेत सहभाग नोंदवला….