गणराज्य न्यूज राहुरी – तालुक्यातील वळण येथे “सुवर्ण महोत्सव” निमित्ताने सोमवार ५ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह (वर्ष ५०) किर्तन महोत्सव सुरू होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन होणार आहे.
शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) सप्ताहास भेट देणार आहेत. तरी या ज्ञान यज्ञाचा तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
ह.भ.प. बन्सी महाराज तांबे व वै. ह.भ.प.भानुदास महाराज गायके यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह.भ.प.श्रीहरी महाराज वाकचौरे यांच्या कुशल मार्गदर्शने दि.५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व “सुवर्ण महोत्सवी” अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात पहाटे भजन, सकाळी विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ या वेळेत हरिकीर्तने तद्नंतर नामजागर अशा दैनंदिन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी ह.भ.प.निलेश महाराज रोडे यांचे प्रवचन तर ह.भ.प.प्रकाश महाराज साठे (बीड) यांचे कीर्तन, मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी आचार्य डाॅ. शुभम महाराज कांडेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी देवाची) यांचे किर्तन, बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी ह.भ.प महेश महाराज रिंधे यांचे प्रवचन तर समाज प्रबोधनकार ह. भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सायंकाळी ६ ते ८ वा. या वेळेत कीर्तन, गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी देविदास महाराज म्हस्के (ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा) यांचे प्रवचन तर ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्री (श्री.क्षेत्र पंढरपूर) यांचे कीर्तन, शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री यांचे प्रवचन तर ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांचे कीर्तन, शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्रीहरी महाराज वाकचौरे यांचे प्रवचन तर महंत आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) यांचे कीर्तन, रविवार दि.११ ऑगस्ट रोजी ह.भ.प मगर महाराज यांचे प्रवचन तर ह.भ.प.पांडुरंग महाराज गिरी (वावीकर) यांचे कीर्तन, सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत भव्य दिंडी प्रदक्षिणा व त्यानंतर १० ते १२ या वेळेत भागवताचार्य ह.भ.प. केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
तदनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या दैनंदिन कार्यक्रमात गायनाचार्य म्हणून संगीत अलंकार किशोर महाराज शेळके, विलास महाराज कोतकर, संदीप महाराज पारे, सुनील महाराज पारे, मृदुंगाचार्य मृदुंग विशारद अनिल महाराज टेकुडे, पवन महाराज खुळे, हार्मोनियम वादक बाळासाहेब महाराज गोसावी तर चोपदार म्हणून मधुकर महाराज आढाव यांची साथसंगत लाभणार आहे. तरी दैनंदिन होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त ग्रामस्थ वळण यांनी केले आहे.