राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणीच्या मार्केटमध्ये नवी मोठी भर पडत आहे. आता व्ही.के उद्योग समूहाकडून पी.ओ.पी मटेरियल बनवण्याचा प्लांट (प्रकल्प) उभारण्यात येत आहे. पी.ओ.पी साठीच्या साहित्याची होलसेल सप्लायर्स सुरू करण्यात येत आहे.यामाध्यमातून अनेकांच्या हाताला देखील काम मिळणार आहे.जिल्ह्यात 4 था व राहुरीसह परिसरातील तालुके मिळून पहिलाच उपक्रम आहे.त्यामुळे या उद्योग समूहाच्या माध्यमातून ब्राह्मणी जी आणखीनही ओळख निर्माण होणार आहे.
श्रावण महिन्याची सुरुवात व पहिला सोमवार या शुभ मुहूर्तावर 5 ऑगस्ट रोजी श्रीराम सेवा धामचे प्रमुख हभप सुखदेव महाराज गाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याची माहिती इंजिनीयर किशोर मधुकर बानकर यांनी दिली.
उत्कृष्ट कामाच्या जोरावर गत दोन वर्षात बांधकाम क्षेत्रात आपलं नाव करणारे इंजिनीयर किशोर बानकर व इंजिनीयर वैष्णवी बानकर या दाम्पत्य जोडीने अनेकांचा विश्वास संपादन केला. प्रामाणिकपणा, कामाची वेगळी पद्धत, बांधकामावर लक्ष नाविन्यपूर्णता, बांधकाम करणाऱ्या घरमालकाच हित,त्याचा फायदा महत्वपूर्ण मार्गदर्शन इंजिनीयर बानकर करत असतात. तालुक्यात जिल्ह्यात व ब्राम्हणी परिसरात अनेक बांधकामाचे डिझाईन व काम बानकर यांनी केले आहे. अल्पावधीत त्यांनी अनेकांचा विश्वास संपादन केला. आता पुन्हा या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन पाऊल ते टाकत आहेत. त्यासाठी आपल्या शुभेच्छा आशीर्वाद महत्त्वाचे आहेत आपण सर्वांनी उद्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे.
आपल घर व्यवस्थित व्हावे. भारी,आकर्षक दिसावे. यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अगदी तेच काम इंजिनीयर बानकर यांच्या माध्यमातून काम सुरु आहे.आता यामध्ये आणखी एक नवी भर पडली. ती नव्या व्यवसायाची ते म्हणजे पी.ओ.पी मटेरियल & होलसेल सप्लायर्सचे….आता पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांना सुद्धा पी.ओ.पी करण्यासाठी गावातच मटेरियल मिळणार आहे. घर व्यवसाय दुकान ऑफिस आदी ठिकाणी आता पी.ओ.पी करता येणार आहे.
पी.ओ.पी साठी लागनारे सर्व प्रकारचे मटेरियल यामध्ये जिप्सम बोर्ड, फ्रेमिंगसाठी लागणारी GI पट्टी, PVC पॅनल, Armstrong सिलिंग इ.सर्व GI पट्टी (बॉटम, L, चॅनल पट्टी ) पाहिजे तशी तयार करून देण्यात येणार आहे.