राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे शिवसेना राहुरी तालुका ३२ गाव (श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ) बैठक मा.खा.सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.या बैठकीस शिवसेना पक्षाचे नगर उत्तर जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे,युवा नेते प्रशांत लोखंडे,मा.आ.भाऊसाहेब कांबळे,अनुसूचित जाती जमाती उत्तर महा.अध्यक्ष भाऊसाहेब पगारे,शेतकरी आ.ता.प्रमुख बाळासाहेब कदम,प्रज्वल पवार,शिवसेना राहुरी ता.प्र.देवेंद्र लांबे,राहता ता.प्र.सागर बोठे उपस्थित होते.
या बैठकीस मार्गदर्शन करतांना मा.खा.सदाशिव लोखंडे म्हणाले कि ,राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून राज्यामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेले आहेत.सर्वसामान्य जनतेचा विचार करत लाडकी बहिण योजना,शेतकरी मोफत विद्युत योजना,वैद्यकीय योजना यासह शिर्डी लोकसभा मतदार संघात भरघोस विकास निधी महायुती सरकारच्या काळात देण्यात आला आहे.शिवसैनिकांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागावे.१० ऑगष्टला दुपारी १२ वा. शिवसेना उपनेते आ.भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पाथरे येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळावा होणार आहे.या मेळाव्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.एकप्रकारे शेकरी मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार नारळच शिवसैनिक फोडणार आहेत,त्यामुळे हजारोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे असे मा.खा.सदाशिव लोखंडे म्हणाले.
या प्रसंगी शिवसेना नगर उत्तर जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे म्हणाले कि शिवसैनिकांनी प्रत्येक गाव नियाह बूथ कमिटी यादी व शिवसेना शाखा निर्माण कराव्यात.सर्व शिवसैनिकांनी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम जनसामन्या माणसांपर्यंत पोहचवावे.
शेतकरी आयोजन समितीचे प्रज्वल पवार यांनी शेतकरी मेळाव्याच्या नियोजनात बाबत माहिती दिली.
या प्रसंगी भाऊसाहेब पगारे,प्रशांत लोखंडे,मा.आ.भाऊसाहेब कांबळे,बाळासाहेब कदम,किशोर वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी केले.तर आभार वसंत कदम यांनी मानले.
उपजिल्हा प्रमुख जयवंत पवार,वसंत कदम,महिला आ.ता.वनिता जाधव,पोपट घाडगे,दादासाहेब खाडे,प्रशांत मुसमाडे,अशोक तनपुरे,सोमनाथ धुमाळ,राजन ब्राम्हणे,डॉ.सचिन पवार,अशोक साळुंके,सुनील खपके,सुभाष दाते,सदानंद शिरसाठ,विनोद पवार,किरण माळी,प्रकाश नान्नोर,सुधाकर लोंढे,संजय काळे,सर्जेराव सोनवणे,गुलाब निमसे,बाळू जाधव,डॉ.आशिष बिडगर,अशोक बिडगर,अशोक शेळके,मनोज नान्नोर,गणेश पवार,अशोक फुलमाळी,ज्ञानदेव आढाव,नवनाथ पवार,सारंगधर साठे,विलास बनसोडे,संजय काळे,सोपान कोतकर,तारडे सुधाकर सतीश बटवाल आदी उपस्थित होते.