राहुरी : दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी मोलमजुरांच्या न्याय हक्कासाठी शुक्रवार 9 ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजी नगर मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य आक्रोश मोर्चा होत आहे.तरी नगर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटक आप्पासाहेब ढोकणे व उत्तर जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले आहे.