राहुरी : जीवनात गुरूचे स्थान महत्त्वाचे आहे. गुरु चांगला असेल तर शिष्याचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन हभप कविताताई साबळे यांनी केले.
ब्राम्हणी येथील श्री संत मालिका मंदिर येथे भागवत महाराज कोळी काका यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवसाचे (७ ऑगस्ट रोजी) कीर्तन सेवेप्रसंगी त्या बोलत होत्या.
गुरुचे जीवनातील महत्त्व,कार्य याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितले.
गुरु परंपरा प्रेरणीत वारकरी संप्रदाय, संत मालीका मंदिर ब्राह्मणीच्या संस्थापक गुरुवर्य कोळी काकी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षापासून दरवर्षी मोठा धार्मिक उत्सव असतो.दरम्यान ज्ञानदानाबरोबर अन्नदानाचे पवित्र कार्य सुरू असते. परिसरातील साधक अध्यात्मिक आनंदासाठी दररोजच्या विविध कार्यात सहभागी होत असतात.
चौथ्या दिवशी किर्तन सेवे प्रसंगी अविनाश सारंगधर बानकर यांनी संत पूजन केले.
सकाळचा नाश्ता श्रीमती शोभा जालिंदर हापसे,दुपारचे अन्नदान सुभाष विश्वनाथ बर्डे व जनार्दन निवृत्ती मोकाटे यांनी केले. सायंकाळी कीर्तनानंतर डॉ.सुभाष चावरे व नारायण गायकवाड यांच्याकडून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. सप्ताहासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वाचे निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी आभार मानत गुरुवारच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. दरम्यान मोकाटे गुरुजी यांनी आपले विचार मांडले.
आज गुरुवार सायं हभप प्रकाश महाराज म्हात्रे (डोंबिवली) यांचे किर्तन होणार आहे.