ब्राम्हणी : सहकारी सोसायटीमधील नागराजाची भाजपा तालुकाध्यक्ष व सोसायटीचे माजी चेअरमन सुरेशराव बानकर यांनी सकाळी विधिवतपूजा केली.
दरवर्षी नागराजास रंग देवून उजाळा दिला जातो. शेकडो वर्षाची परंपरा यंदाही कायम राहीली.पूर्वी याच ठिकाणी पंचमीच्या दिवशी महिला नागराजाची पूजा करत.आता देवी मंदिरा पाठीमागे पूजा केली जाते.अतिशय सुबक व आकर्षक असे नागराज सोसायटी आवारात आलेल्या अनेकांचे लक्ष वेधून घेतात.