राहुरी : पंचायत समिती कार्यालयात हर घर तिरंगा उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी करण्यात आला.
9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याची सुरुवात शुक्रवारी विविध उपक्रमाने करण्यात आली.
राहुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वैभव शिंदे, साहेब गट विकास अधिकारी गोरक्षनाथ खळेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ.शैलेश बन ,महिला व बाल विकास अधिकारी शिंदे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनिल सरोदे, गणेश लहानगे सहाय्यक प्रशासन अधिकारी आदीसह विविध खात्यांचे अधिकारी ,कर्मचारी सहभागी झाले होते.