ब्राम्हणी : स्व.विलास बानकर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नागपंचमी सण उत्साहात साजरा झाला.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे.या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.निसर्गाच्या बांधिलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला. नागपंचमी सणाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे.या उद्देशाने दरवर्षी स्व.विलास बानकर स्कूलमध्ये नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
या सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वारुळाचे पूजन करून नागदेवता प्रति त्यांचे भक्तिमय भावना प्रकट केली.तसेच विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला व विद्यार्थिनींनी झोका खेळण्याचा आनंद लुटला. अशा आनंदमय वातावरणात हा नागपंचमीचा सण वारुळाला दूध लाह्या अर्पण करून साजरा करण्यात आला.