Home महाराष्ट्र दशक्रियाविधी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

दशक्रियाविधी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

53
0

राहुरी : उंबरे गावचे सुपुत्र व अडसुरे परिवाराच भूषण स्व.मिलिंद दत्तात्रय अडसुरे यांना आपल्यातून जावून 10 दिवस पूर्ण होत आहे.उद्या रविवार 11 ऑगस्ट रोजी त्यांचा दशक्रिया विधी..त्यानिमित्त त्यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली….10 दिवसाच्या काळात अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

स्व.मिलिंद भाऊ अडसुरे यांच्या अंत्यविधीला उपस्थित असणारा जनसमुदाय हिच त्यांच्या आत्तापर्यंतच्या कर्तुत्व व कार्याची पावती पहायला मिळाला. मोठा गोतावळा असलेला अडसूरे परिवार कायम इतरांच्या सुख दुःखात सहभागी होतो. ते दहा दिवसाच्या काळा घरी भेटण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीतून दिसून आलं. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत सात्वनपर भेटीसाठी नातेवाईक, मित्रपरिवार,हितचिंतक,विविध घटकातील लोकांची गर्दी अडसुरे यांच्या घरी पहायला मिळाली.

मिलिंद भाऊंनी एल.एल.बी शिक्षण पूर्ण केलं.पुढे वकिली करण्याऐवजी आपले वडील व भाऊ राजकारणात व समाजकारणात चांगलं काम करत असल्याने त्यांना पूर्णवेळ त्यासाठी मिळावा.मग आपण कुटुंब,शेती सांभाळू असा विचार स्व.मिलिंद भाऊ अडसुरे यांनी केला.सोबत पशुपालनाची त्यांना आवड निर्माण झाली.शेतीच्या जोडीला दूध व्यवसाय सुरू झाला.

वडील प्रा. दत्तात्रय अडसुरे सर व बंधू सुनील भाऊ अडसुरे यांचे राजकारण व समाजकारणातील कामाबाबत त्यांना कायम अभिमान राहिला. उंबरे गावाच्या सहकार व ग्रामपंचायतच राजकीय नेतृत्व, पंचायत समिती सदस्य, डॉ.तनपुरे कारखाना संचालक, कुस्ती संघटनेचे पदाधिकारी याशिवाय लहान-मोठे अनेक पद प्रा. दत्तात्रय अडसुरे व सुनील भाऊ अडसुरे यांनी यशस्वीपणें सांभाळली.त्यासाठी स्व. मिलिंद भाऊची भूमिका महत्त्वाची ठरली.

स्व. मिलिंद भाऊ यांनी कायम मित्र परिवार जोडला.
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कायम नातेवाईक, मित्रांच्या सुख दुःखात सहभागी होत. मदत व सहकार्याची भुमिका कायम दिसून आली, समाजकारण व धार्मिक कार्याची आवड असलेल्या मिलिंद भाऊंचा कायम विविध कार्यात सक्रिय सहभाग राहिला. सलग तीन वर्ष मित्र परिवारासोबत अमरनाथ यात्रा केली. आळंदी,पंढरपूर पायी वारी केली. आध्यात्मिक आनंद घेतला. चारीधाम यात्रा केली.

दुर्दैवाने आजारी पडले. या काळात उपचारासाठी पुणे, नगर प्रवास झाला.आजारपणात उपचारा दरम्यान संपूर्ण अडसुरे कुटुंब व सुनील भाऊ कायम पाठीशी उभा राहिले.त्यासाठी प्रत्येक गोष्ट उभी केली.पण नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही. असा म्हणतात…अखेर कॅन्सर सारख्या आजाराशी त्यांची झुंज यशस्वी ठरली.अन् त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.
आई वडिलांना मुलगा गेल्याचे, पत्नीला पती गेल्याच मुलांना वडील गेल्याच तर सुनील भाऊंना आपला आधार असलेला भाऊ गेल्याचे दुःख कायम राहील.

दहा दिवस दुःखाच्या काळात अनेकांनी घरी येवून आधार देण्याचे काम केले. मिलिंद भाऊंच्या अनेक गोष्टी व आठवणींना उजाळा दिला.

मिलिंद भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here