Home राहुरी मुळा नदीकाठच्या नागरिकांनो सावधान

मुळा नदीकाठच्या नागरिकांनो सावधान

71
0

राहुरी – मुळा धरणातून नदी पात्रात सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.

मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26,000 दलघफु (26 टीएमसी) आहे. आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार १ ते १५ ऑगस्ट दरम्यान पाणीसाठा Lower Guide curve नुसार 21264 व Upper Guide Curve नुसार 22814 इतका पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दूपारी 03.00 वाजता मुळा धरणातून 2000 क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल.

तरी याबाबत मुळा नदीकाठच्या गावांना या जाहीर आवाहनाद्वारे सूचित करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु ,वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.असे आवाहन.सायली पाटील (कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग) यांच्याकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here