राहुरी : जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 18 जुलै 2024 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ.अण्णासाहेब शिंदे सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व फोटोग्राफर सदस्यांच्या परिवारातील महिला भगिनींचा विशेष भेटवस्तू देवून सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान ज्येष्ठ फोटोग्राफर बांधव, गुणवंत विद्यार्थी,सर्व फोटोग्राफर बांधवांचा आंब्याची झाडे देवून सन्मान करण्यात येणार आहे.
झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा – सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत वृक्ष लागवडीचा संदेश आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश सर्व फोटोग्राफर बांधवांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी सर्व सभासदांना अपघाती विमा संरक्षण 7 सात लाख रुपये, स्री जन्माचे स्वागत, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे व गणवेशाचे वाटप, रक्तदान शिबिरे, गणेश उत्सव कार्यक्रम, वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण, विविध फोटोग्राफर बांधवांना आजारपणात मदतीचा हात, पोलीस मित्र आय कार्ड वितरण, फोटोग्राफर संस्थेचे टी-शर्ट वितरण, विविध पर्यटन स्थळांना सहलीच्या माध्यमातून भेटी असे एक ना अनेक उपक्रम राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेले आहेत.
या कार्यक्रमासाठी यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे, युवा उद्योजक गोरक्ष अडसुरे, मोरया उद्योग समूह संस्थापक अध्यक्ष राहुरी, तसेच सर्व ज्येष्ठ फोटोग्राफर बांधव, पत्रकार मित्र उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीततेसाठी संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र विटनोर, उपाध्यक्ष काकासाहेब गडदे, सचिव गणेश नेहे, सहसचिव आदिनाथ मुसमाडे,सर्व संचालक मंडळ पदाधिकारी तसेच सर्व फोटोग्राफर बांधव विशेष प्रयत्न करत आहेत.
फोटोग्राफर बांधवांसाठी अद्यावत ज्ञान प्राप्त होण्यासाठी विविध प्रकारचे ॲडव्हान्स व हायटेक तंत्रज्ञानाची फोटोग्राफी मार्गदर्शन शिबिरे, फिल्म मेकिंग कार्यशाळा, अल्बम डिझाईन कार्यशाळा विविध नवनवीन कॅमेऱ्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या कार्यशाळा जुन्या नव्या फोटोग्राफर बांधवांचा चर्चासत्र असे अनेक उपक्रम संस्थेने हाती घेतलेले आहेत.
राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेचे आपल्या कार्याच्या माध्यमातून राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील सदस्य जोडले आहे. चांगलं कामाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अभिमानाने संस्थेचे नाव घेतले जात आहे.