डॉ.तनपुरे सहकारी कारखान्याची माजी संचालक,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) पक्षाचे राहुरी तालुका कार्याध्यक्ष भारतभाऊ भैय्यासाहेब तारडे पाटील यांच्यावर दिवसभर वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
स्व.भैय्यासाहेब तारडे यांचा राजकीय,सामाजिक वारसा भारत तारडे यशस्वीपणे पुढे घेवून जात आहे.सन 1978 मध्ये तारडे परिवाराच्या राजकारणाला सुरुवात झाली.स्व.भैय्यासाहेब तारडे यांनी गाव पातळीवर एका गटाचे नेतृत्व केलं. ग्रामपंचायत सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत वैचारिक सहकार्यांना सोबत घेऊन विरोधकांना कायम आव्हान दिले.लोकनेते स्व.खासदार बाळासाहेब विखे पाटील,लोकनेते स्व. रामदास नाना धुमाळ यांच्या समवेत राजकीय जीवनात काम केले.
1984 ते 2016 दरम्यान तारडे परिवारातील 3 सदस्य संचालक पदावर कार्यरत राहिले.अनेक वर्ष राजकीय संघर्ष केला. तालुक्यातील हितचिंतक, नातेवाईकांच्या सहकार्याने राजकारण यशस्वी झाल.आता स्व.भैय्यासाहेब तारडे यांचे विचार व काम भारत भाऊ तारडे यांच्या रूपाने पुढे जात आहे.
शांत,संयमी नेतृत्व म्हणून कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात.
आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी नुकतीच त्यांच्यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या राहुरी तालुका कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व अन् पदाला न्याय देण्यासाठी तळागाळात काम सुरू आहे.
तारडे परिवार कायम सर्वसामान्यांसाठी काम करत आला. सर्वसामान्यांची कामे मार्गी लागावीत.आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून ब्राम्हणी गावाचा परिसराचा विकास करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मंत्री पदाच्या व आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामे केली. भविष्यात पुन्हा दादाचं आमदार होणार आहेत.पुन्हा सत्ता येणार आहे.त्यामुळे अनेक कामे मार्गी लावण्याचा संकल्प आहे.अशी प्रतिक्रिया डॉ.तनपुरे सहकारी कारखान्याची माजी संचालक,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) पक्षाचे राहुरी तालुका कार्याध्यक्ष भारतभाऊ भैय्यासाहेब तारडे पाटील यांनी दिली.