गणराज्य न्यूज राहुरी : एक कामासाठी सर्वसामान्य एका महिलेकडे एक हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तहसील परिसरातील एका सेतू केंद्र चालकास तहसीलदार नामदेव पाटील यांनी आज सोमवारी दुपारी चांगलेच झापले.
सदर महिलेने तहसीलदार पाटील यांच्याकडे तक्रार केली. लागलीच तहसीलदार नामदेव पाटील त्या महिलेसोबत सेतू केंद्रात दाखल झाले. तहसीलदार पाटील यांनी सदर सेतू केंद्र चालकाला चांगलेच फैलावर घेत प्रश्न विचारले.
एवढे पैसे कसे घेतात. जास्त शहाणे झालेत काय? तहसीलदारांचा रुद्र अवतार पाहून त्या सेतू केंद्र चालकाची चांगलीच बोबडी वळाली.
सर्वसामान्य गोरगरिबांच्या कामासाठी सदर प्रकार राहुरी शहरासह तालुक्यात सुरू आहे. कोणी तक्रार करत नाही म्हणून केंद्र चालक अव्वाच्या सव्वा रुपये घेतात. कोणी तक्रार करत नाही कारण प्रत्येकाला आपलं काम महत्त्वाचं असतं. आज रक्षाबंधन दिनी एक महिला तहसीलदार यांच्याकडे गेली आणि भावाच्या नात्याप्रमाणे तहसीलदार पाटील यांनी लागलीच त्या केंद्र चालकाची कान उघडणी केली.
विशेष म्हणजे आज रक्षाबंधन सर्वत्र बहीण म्हणून महिलेचा सन्मान होत असताना सेतू केंद्र चालक महिलेला एवढे पैशाची मागणी करतो याबाबत याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून तहसीलदार यांनी आपल कर्तव्य बजावलं.पण यास आता कायम लगाम बसावा यासाठी प्रयत्न व्हावेत अशी तालुक्याची मागणी आहे.
तालुक्याला काम घेवून येणाऱ्या लोकांना अव्वाच्या सव्वा पैसे मागण्याचा विषय नवीन नाही.त्यासाठी तहसील परिसरात आवारात फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून कोणत्या कामाला किती रुपये लागतात? नियमानुसार त्याचा बोर्ड लागणे गरजेचे आहे?आणि ते तहसीलदार नामदेव पाटील करतील अशी अपेक्षा राहुरी तालुक्यातील जनतेला आहे.