Home महाराष्ट्र अ.नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

अ.नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

29
0

नगर :- 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागातील राजकीय पक्षांसमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली.

दरम्यान नवीन मतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले.

या बैठकीस यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शाहू मोरे, तहसिलदार प्रदीप पाटील हे तर दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ गेडाम म्हणाले की, मतदार यादी अधिक अचुक व पारदर्शक होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रतिनिधींची नेमणुक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सुचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here