राहुरी – पुढाऱ्यांनी राहुरी मतदारसंघातील राजकारण करत संस्था बंद पाडल्या ऊस उत्पादक व शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला कारखाना सुरू होऊ शकतो यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही काम धेनू चालू करावी लागेल मतदारसंघांमध्ये अपेक्षित विकासकामे झालेली नाही.
यासाठी विधानसभा महत्वाची आहे. राहुरी विधानसभा निवडणूक तुमच्यासारख्या सहकाऱ्यांनी हातात घेतली तर नक्कीच लढविणार असल्याचे राजुभाऊ शेटे म्हणाले.
नुकताच सहकाऱ्यांचा विचारविनिमय मेळावा झाला. यावेळी शेटे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते गोविंद म्हसे होते. शेटे म्हणाले की, राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी व जनतेची मागणी असेल तर विधानसभा लढवणार आहे.
आपल्याला कोणावर टीकाटिपणी करायची नाही आपल्याला फक्त विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. मुळा प्रवारा संस्था गेली कारखाना बंद पडला कारखान्याची सलग्न असलेल्या संस्थेमध्ये किती भ्रष्टाचार होतो. याची माहिती घेणे गरजेचे आहे.
तसेच नगर मनमाड रस्त्याची दुरावस्थेमुळे हजारो नागरिकांचे बळी गेले.
यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले यासह राहुरीच्या विद्यापीठातही मोठा भ्रष्टाचार सुरू आहे.
तर हा कार्यकर्त्यांचा मेळावा नसून सहकाऱ्यांशी विचार विनिमय बैठक असल्याचे शेटे म्हणाले.