Home महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार जाहीर

समाजभूषण पुरस्कार जाहीर

41
0

सोनई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देवस्थान सेवा ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे(राजकीय) नेवासा येथील संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख(सामाजिक) तांदळे महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पंढरीनाथ महाराज तांदळे (आध्यात्मिक) कांदा व्यापारी सुदाम तागड ( उद्योग) सोनई येथील पत्रकार विनायक दरंदले ( पत्रकारिता) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रविवार दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती अहिल्यादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मणराव बारगळ यांनी दिली आहे.

सोनई येथील अहिल्यादेवी मंदीरात पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह व किर्तन महोत्सव कार्यक्रमात माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख व आळंदी येथील निवृत्ती महाराज मतकर यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराचे वितरण होणार असून मांचीहिल येथील ज्ञानगंगा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शाळिग्राम होडगर अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे सचिव शहादु राशिनकर,विश्वस्त मंडळ व समाज बांधवांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here