Home राजकीय त्या रात्रीच्या ड्रोनच्या घिरट्याने उडाली झोप

त्या रात्रीच्या ड्रोनच्या घिरट्याने उडाली झोप

46
0

ब्राम्हणी : शनिवारी 31 ऑगस्टच्या रात्री राहुरी-सोनई महामार्गलगतच्या ब्राम्हणीतील मोकाटे-गायकवाड वस्ती,पटारे वस्ती व खोसे वस्ती परिसरात अचानक घिरट्या घालणाऱ्या ड्रोनने अनेकांच्या झोपा उडवल्या.

रात्री अनेकांनी एकमेकांना फोन, व्हाट्सअपच्या माध्यमातून याची कल्पना दिली.रात्री 12 च्या दरम्यान सदर ड्रोन गायब झाल्याची माहिती सकाळी स्थानिकांनी दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्रोन फिरतय का? असा प्रश्न पडला.पण दुपार पासून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने ड्रोन आज दिसणार नसल्याच लक्षात घेता लोक बिनधास्त पणे झोपी गेले.पण शनिवारी रात्री फिरणाऱ्या त्या ड्रोनचा अद्याप तपास लागला नसल्याचे लोक सांगतात. प्रत्येकाने आपापल्या परीने अंदाज काढले. पण नेमकी विषय काय? रात्री कशासाठी फिरल…हे अद्याप अस्पष्ट आहे.

रविवारी दिवसभर अनेकांनी गणराज्य न्यूजशी याबाबत संपर्क साधला. राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी आमच्याकडे कोणतेही माहिती नाही.अथवा यासाठी कोणाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. सदर विषय पोलीस प्रशासनाला सूचित करून चौकशी बाबत कळविले जाईल. असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले.

अधिक माहिती घेवून प्रशासनाने लोकांना याबत आवाहन करून धीर द्यावा.जेणे करून उलट सुलट चर्चेला पूर्णविराम मिळेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here