गणराज्य न्यूज सोनई – नेवासा तालुक्यातील लांडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल स्कूल इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड, मोफत पिठाची गिरणी वाटप, सर्व कुटुंबांना मोफत डसबीन वाटप व संकलन कचरा गाडी आदी कामाचा शुभारंभ सोहळा आज बुधवार 4 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनील भाऊ गडाख यांच्या हस्ते व सरपंच सौ.सुवर्णाताई मिनिनाथ दरंदले यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे दरम्यान जिल्हा सुपरवायझिंग फेडरेशन चेअरमन पदीनिवड झाल्याबद्दल संजय पद्माकर दरंदले यांचा सन्मान होणार आहे.
याप्रसंगी विविध विभागाचे व खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लांडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच सोमनाथ अशोक लांडे व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ लांडेवाडी यांनी केले आहे.