Home Blog गणराज्य न्यूज कार्यालयात लाडक्या बाप्पाच थाटात स्वागत

गणराज्य न्यूज कार्यालयात लाडक्या बाप्पाच थाटात स्वागत

30
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी – सहकारी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गणराज्य न्यूज कार्यालयात श्री चे आज थाटात स्वागत करत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष फोटोग्राफर ईश्वर लहारे व सौ. प्रियंका लहारे यांनी विधिवत श्री ची स्थापना करून सपत्नीक आरती केली.यावेळी उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्राध्यापक गणेश हापसे, सचिव प्राध्यापक राहुल रणसिंग आदीसह गणेशभक्त उपस्थित होते.

यंदाच्या गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ईश्वर लहारे तर, उपाध्यक्षपदी प्राध्यापक गणेश हापसे,सचिवपदी राहुल रणसिंग यांची निवड करण्यात आली.मार्गदर्शक सल्लागार म्हणून गणराज्य न्यूजचे संपादक निवेदक पत्रकार गणेश हापसे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमाचे नियोजन सुरू आहे.

दरवर्षी ब्राम्हणी – सहकारी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गणराज्य न्यूज कार्यालयात मोठ्या थाटात गणरायाचे आगमन होते.दहा दिवस विविध उपक्रम राबविले जातात.विविध मान्यवर पाहुणे,शाळकरी विद्यार्थी यांचे हस्ते आरती केली जाते. यंदाच्या वर्षीही विविध उपक्रमांचे आयोजन केले असून त्यासाठी गणेश उत्सव कार्यकारणी तयार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here