ब्राह्मणी – ग्रामपंचायतचे माजी सदस्य, भाजपा किसान युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत सिताराम हापसे पाटील यांच्या स्टेटसला रविवारी दिवसभर घड्याळाचा व्हिडिओ दिसल्याने ब्राह्मणीत उलट सुलट राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नेमकी दबावतंत्र की संभ्रम भविष्यात प्रश्न? अनुउत्तरीत…!
ब्राह्मणीच्या स्थानिक राजकारणात गत पंचवार्षिकमध्ये विरोधी गटाकडून ग्रामपंचायत निवडणूक लढवून सदस्यपद मिळविणारे हापसे आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटात सक्रिय असल्याचे दिसून आले. स्थानिक राजकारणात दोन्ही गटाकडून राजकीय वाटचाल करणारे श्री.हापसे तालुक्याच्या पक्षीय राजकारणात कायम भाजप सोबत दिसून आले.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले उमाकांत हापसे पाटील आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने दिसून येत आहे. दोन दिवसात राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश होण्याची शक्यता आहे.
याबाबत गणराज्य न्यूजने माजी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत हापसे पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पक्षप्रवेशाबाबत दुजोरा दिला.