Home क्राईम योद्धा प्रतिष्ठानच्यावतीने कीर्तन महोत्सव

योद्धा प्रतिष्ठानच्यावतीने कीर्तन महोत्सव

25
0

गणराज्य न्यूज ब्राह्मणी – गावातील योद्धा प्रतिष्ठानच्यावतीने श्री गणेशोत्सवानिमित्त बानकरवाडी येथे एक दिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हभप माऊली महाराज मोरे यांचे कीर्तन होणार आहे.तरी परिसरातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

गत अनेक वर्षापासून योद्धा प्रतिष्ठानकडून गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात. महाकाल भक्त असलेल्या योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने उज्जैन येथे भगवान श्री महाकाल यांच्या दर्शन यात्रेच आयोजन केले जाते. ग्रुपमधील सदस्यांचा जन्मदिवस विधायक उपक्रमांनी साजरा केला जातो. अशा आदर्शवत ठरलेल्या योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आज कीर्तन महोत्सवाचा आयोजन करण्यात आल आहे. भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशदादा बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व सदस्य उत्कृष्ट काम करत आहेत. तरी,आपण आजच्या नियोजित कीर्तन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे.. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here