Home अहमदनगर उमाकांत हापसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

उमाकांत हापसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

26
0

ब्राह्मणी – ग्रामपंचायतचे माजी सदस्य,भाजपा किसान युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत सिताराम हापसे पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे व राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या अनुराधाताई नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा येथील कार्यक्रमात उमाकांत हापसे यांनी पक्ष प्रवेश केला.दरम्यान पक्षप्रवेश होताच उमाकांत हापसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे यांनी उमाकांत हापसे यांना निवडीचे पत्र दिले. हापसे यांच्या रूपात राष्ट्रवादीला चांगला तरुण कार्यकर्ता मिळाला आहे. राहुरी तालुक्यात संघटना वाढीसाठी निश्चित मदत होईल.असा विश्वास जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे यांनी व्यक्त केला.

उमाकांत हापसे यांच्या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया युवकचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत हापसे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here