राहुरी – तालुक्यातील ब्राह्मणी परिसरातील जुन्या वने वस्ती परिसरात असलेली पटारे (विद्युत रोहित्र) डीपी नादुरुस्त झाले.दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे तात्काळ विद्युत रोहित्र दुरुस्त करून मिळावे अशी मागणी शनिवारी सकाळी केली. आमदार तनपुरे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचित केले.अन् आज सायं डीपी बसविण्यात आली.अवघ्या एका दिवसात विद्युत रोहित्र दुरुस्त करून दिले.त्याबद्दल आमदार तनपुरे यांच्या कामाचं शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
उपसरपंच गणेश माणिक तारडे,भाऊराव वने,गणेश बाळासाहेब तारडे,अरुण कानडे,माणिक पटारे,सोमनाथ तारडे,आप्पासाहेब वने,अनिल तारडे,राहुल कानडे
दादा पटारे,आबासाहेब वने आदींनी पाठपुरावा केला. विद्युत रोहित्र प्रत्यक्ष बसवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी महावितरण कर्मचारी व खाजगी वायरमन यांना सहकार्य केले.
सांगितलेलं काम मार्गी लावण्याच काम आमदार प्राजक्त दादा तनपुरे करतात. प्रत्येक कामाचा स्वतः पाठपुरावा करतात. याच त्यांच्या वैशिष्ट्यामुळे प्रत्येक माणसाला आपला हक्काचा आमदार वाटतो.अशी प्रतिक्रिया उपसरपंच गणेश माणिक तारडे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.