Home महाराष्ट्र स्वखर्चातून मुरुम टाकून रस्ते दुरुस्त

स्वखर्चातून मुरुम टाकून रस्ते दुरुस्त

51
0
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
  • राहुरी : माजी आमदार व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या स्वखर्चातून ब्राम्हणी गावातील वाड्यावर वस्तीवरील रस्त्यावर मुरूम टाकण्याच काम सुरू आहे.

पावसाळ्याच्या दिवसात रस्ते खराब झाले. रस्त्यावर खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना प्रवास करताना कसरत करावी लागत.अनेकांनी रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली.त्यानुसार भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर यांनी माजी आमदार यांच्याकडे मुरूम टाकण्याची मागणी केली.त्यासाठी पाठपुरावा केला.गत चार दिवसापासून मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे.

भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर,सरपंच सौ.सुवर्णा बानकर,ब्राम्हणी सोसायटीचे चेअरमन व ग्रा.पं सदस्य महेंद्र तांबे,अरुणराव बानकर,बाबासाहेब ठकाजी गायकवाड,विजयराव बानकर, अनिल ठुबे,गिरीराज तारडे आदीसह प्रभागातील सदस्य,कार्यकर्ते मुरूम टाकून घेण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर दिसत आहेत.

नादुरुस्त रस्ते मुरमीकरणामुळे दुरुस्त झाल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. स्वखर्चातून रस्ते दुरुस्त केल्याने ग्रामस्थांकडून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here