Home राजकीय राहुरी : मार्केट कमिटी सर्वसाधारण सभा

राहुरी : मार्केट कमिटी सर्वसाधारण सभा

23
0

राहुरी : कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वउत्पन्नातून प्रगती केली असून अनेक आव्हाने स्वीकारत शेतकरी हिताचाच कारभार केला असल्याचे प्रतिपादन सभापती अरुण तनपुरे यांनी केले.

नगर मनमाड रोडवर खरेदी केलेल्या सुतगिरणीच्या १३ एकर जागेत लवकरच खुला कांदा मोंढा जनावरांचा बाजार व फळांचा बाजार व कोल्ड स्टोरेज सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सोमवारी बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे, गोरक्षनाथ पवार, रामदास बाचकर दत्तात्रय शेळके सुभाष डुक्रे चंद्रकांत पानसंबळ महेश पानसरे मारुती हारदे मधुकर पवार मंगेश गाडे,किसनराव आढाव,भाऊसाहेब खेवरे आदि उपस्थित होते.

सभापती तनपुरे म्हणाले की पीक पद्धतीत बदल झाल्याने बाजार समितीला ही बदलावे लागले त्यामुळे चांगले यश मिळाले आहे प्रारंभी कांदा मोंढा चालू करण्यासंबंधी अनेक शंका होत्या मात्र त्या दूर करून बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने स्थैर्य मिळाले आहे. शेतकरी व्यापारी हमाल मापाडी या सर्वांच्या सहकार्यामुळेच मोठी कामगिरी झाली आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज समितीवर नसून स्व उत्पन्नातून आवारातील रस्ते विज पिण्याचे पाणी व्यापारी संकुल व शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत

.यावर्षी विश्वास संपादन केल्याने जिल्हा बाहेरूनही शेतकरी आपला शेतमाल राहुरीत विक्रीसाठी आणतात.
बाजार समितीने सूतगिरणीची १३ एकर जमिन खरेदी केली असून त्या ठिकाणी खुला कांदा मोंढा, जनावरांचा बाजार, फळांचा बाजार सुरू केला जाणार असून त्या दृष्टीने कामकाज चालू आहे आज बाजार समितीच्या १८ कोटीच्या ठेवी असून संस्थेस सर्व खर्च वजा जाता ४६०. ५० लाख रुपये वाढावा झाला आहे.न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता कोणताही अडथळा राहिला नाही. सध्या शेतकऱ्यांकडील कापूस बाजारात येत आहे पुढील वर्षी कापूस खरेदीचा प्रयत्न करू. केंद्र सरकारच्या धरसोडी भूमिकेमुळे कांद्याचे दर कमी जास्त होतात त्यातच मागणी व पुरवठा यात तफावत पडली तर दर वाढतात असा अनुभव आहे. राज्यातील बाजार समितीकडे सरकार सहकार्याची भावना ठेवत नाही .केंद्र सरकारच्या ई कांदा लिलावाची कशी पंचायत होते याचे सविस्तर वर्णन केले .ई कांदा लिलाव उपयुक्त नसल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांनी जागेवर कांदा विक्री केली तर फसवणुकीचा जास्त धोका असतो बाजार समितीमध्ये कांदा विकला तर त्यास शाश्वत हमी मिळते. बाजार समितीच्या आवारात लवकरच शेतकरी निवास पूर्णत्वास जात असून तेथे सेवा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत .राहुरी बाजार समितीतील खरेदार व्यापाऱ्यांना इतरत्र नेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला परंतु राहुरीत विश्वास पात्र असल्याने कोणताही विपरीत परिणाम झाला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाजार समिती लवकरच ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहे या काळात अमुलाग्र बदल घडत गेले. बदलत्या परिस्थितीनुसार बाजार समितीलाही वेगवेगळे निर्णय घेणे भाग पडले. शेतकरी हिताला सर्वाधिक प्राधान्य ठेवल्याने बाजार समितीचा नावलौकिक राज्यात नावारूपास आलेला आहे .पर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी राहुरीत कांदा विक्रीसाठी आणतात राहुरीचे अनुकरण इतरांनी केल्याने त्यांनाही फायदा झाला असल्याचे स्पष्ट केले. अहवाल सालात बाजार समितीने नफा मिळविला असून त्याचा उपयोग सेवा सुविधांसाठी केला जाणार असल्याचे नमूद केले.

यावेळी चर्चेत प्रकाश धोंडे कारभारी ढोकणे दत्तात्रय पानसंबळ रमेश वारुळे सुभाष सावज विजय मालवदे यांनी भाग घेतला उपस्थित प्रश्नांना सभापती तनपुरे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
या सभेस उपसभापती बाळासाहेब खुळे रामदास बाचकर दत्तात्रय शेळके सुभाष डुक्रे चंद्रकांत पानसंबळ महेश पानसरे मारुती हारदे मधुकर पवार मंगेश गाडे,किसनराव आढाव,भाऊसाहेब खेवरे सचिव भिकाजी जरे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे साहेबराव दुसिंग, किशोर जाधव, अशोक ढोकणे,यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालक दत्तात्रय कवणे यांनी अहवाल वाचन केले.तर उपसभापती बाळासाहेब खुळे यांनी आभार मानले.वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here