चेडगाव – सौरभ डिजिटल शेतकरी सेवा केंद्राचा उद्या मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता शुभारंभ होत असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सौरभ अशोक हापसे यांनी केले आहे.
चेडगाव सारख्या गावात आता सर्वच प्रकारची ऑनलाइन कामे होणार असल्याने परिसरातील नागरिकांना आता बाहेर गावात जाण्याची गरज पडणार नाही. याशिवाय नियमानुसार जेवढे शुल्क आहे तेवढेच स्वीकारणार ..
सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत व्हावी. त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे सौरभ अशोक हापसे यांनी सांगितले.