राहुरी
आदर्श विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद आहे. यापूर्वीच्या व आताच्या शाळेत खूप मोठा बदल झाला आहे. असे प्रतिपादन सुभाष पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीतील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राहुरी पंचायत समिती शिक्षण विभाग व राहुरी तालुका विज्ञान गणित व चित्रकला संघटनेच्यावतीने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान-गणित चित्रकला प्रदर्शनाचा शुभारंभ बुधवारी पार पडला.यावेळी सुभाष पाटील बोलत होते.
उद्घाटन सोहळा कार्यक्रमाच प्रास्ताविक आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा बानकर या होत्या.यावेळी जेष्ठ नेते सुभाष पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते.श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अधीक्षक अंबादास पारखे,गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे,माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे,उपसरपंच सूर्यभान मोकाटे,प्राचार्य नानासाहेब जाधव,प्राचार्य बाबासाहेब काळे, पर्यवेक्षक बाबासाहेब शिरसाठ, शिक्षक प्रतिनिधी अशोक हुलुळे, शिक्षिका प्रतिनिधी संगीता सुळ, शिक्षकेत्तर प्रतिनिधी नामदेव तेलोरे,सोसायटी संचालक अनिल ठूबे,अशोक नगरे,श्रीकृष्ण तेलोरे,प्रसाद बानकर,
राहुरी तालुका विज्ञान संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण तूपविहिरे, गणित संघटनेचे कार्याध्यक्ष सुहास महाजन, विज्ञान संघटनेचे दत्तकुमार चौधरी, गणित संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत कल्हापुरे, कलाध्यापक संघ अध्यक्ष विशाल तागड, विज्ञान संघटनेचे सचिव सादिक सय्यद, गणित संघटनेचे राजेंद्र सोनटक्के, कलाध्यापक संघाचे सचिव मच्छिंद्र देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी सुमन सातपुते, इंदुमती धट, शोभा कोळसे, केंद्रप्रमुख नीलिमा गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, सचिव रामनाथ थोरात, विषय तज्ञ संतोष गुलदगड, विलास बानकर स्कूलच्या प्राचार्य अश्विनी बानकर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच प्रभावी सूत्रसंचालन दुधे, ज्येष्ठ शिक्षक कैलास ढोके सर यांनी केले.आभार सुनील हापसे सर यांनी मानले.राहुरी तालुक्यातील 15 केंद्र शाळेतून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.