Home महाराष्ट्र वीर भवार याची जिल्हास्तरावर निवड

वीर भवार याची जिल्हास्तरावर निवड

59
0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.43796295, 0.32125);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

 

राहुरी : तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात स्वर्गीय विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी वीर बहिरनाथ भवार याने गणित विभागात इयत्ता 3 री ते 5 वी गटात प्रथम क्रमांक मिळवला.

जिल्हास्तरीय होणाऱ्या प्रदर्शनासाठी वीर याची निवड झाली आहे.

ब्राम्हणीतील आदर्श विद्यालयात 11 ते 13 डिसेंबर दरम्यान राहुरी तालुकास्तरीय विज्ञान गणित व चित्रकला प्रदर्शन पार पडल.शुक्रवार 13 रोजी बक्षीस वितरण कार्यक्रमात राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते विर भवार,विलास बानकर स्कूलचे शिक्षक नवनाथ हापसे व जयश्री मोरे यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे,प्राचार्य नानासाहेब जाधव, राहुरी तालुका विज्ञान संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण तुपविहिरे, राहुरी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे,गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साळाभाऊ नरवडे आदीसह उपस्थित मान्यवरांनी वीर भवार या विद्यार्थ्याचं कौतुक केल.

राहुरी तालुकास्तरीय गणित प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पंढरी प्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख, राहुरी तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर,सरपंच सौ. सुवर्णा सुरेशराव बानकर,प्राचार्य अश्विनी प्रकाश बानकर, उपप्राचार्य मधुबाला किरण बानकर आदींसह अनेकांनी वीर भवार याचे अभिनंदन केले. वीर यास वडील मेजर बहिरनाथ भवार,आई प्राध्यापिका चंद्रकला हापसे-भवार आदीसह शाळेतील वर्गशिक्षक आदींचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here