Home अहमदनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद

8
0

अहिल्यानगर : जिल्ह्यात होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या, मुक्त, शांतता, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होण्याच्यादृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदानाच्या दिनांकास निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व मद्य विक्रीच्या, ताडी विक्रीच्या व इतर संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याअन्वये जिल्ह्यात दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १९ नोव्हेंबर व २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होऊन अधिकृतपणे निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण दिवस आदेश लागू राहतील.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ नुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here