Home अहमदनगर तनपुरेंना वाढता पाठिंबा

तनपुरेंना वाढता पाठिंबा

18
0

राहुरी : परिसरातील शाहू फुले आंबेडकर चळवळीत कार्य करणाऱ्या तसेच वंचित बहुजन आघाडी व आरपीआयच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आमदार प्राजक्त तनपुरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. सर्व पदाधिकाऱ्यांनी राहुरी मध्ये मत विभाजन होऊ देणार नसल्याचे जाहीर करत संपूर्ण तालुका आमदार तनपुरे यांच्या पाठीशी एक संघ राहणार आहे. तसेच मागील पंचवार्षिक पेक्षा मतदानाची टक्केवारी वाढविणार असल्याचे निलेश जगधने सह  पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

          राहुरी येथील आ. तनपुरे कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर चळवळीचे बाळासाहेब जाधव, वंचितचे जिल्हा महासचिव निलेश जगधने, आरपीआय संघटनेचे बाळासाहेब शिंदे, वंचितचे संपर्कप्रमख पिंटूनाना साळवे, महिला युवा जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिंग, वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षा आयनोर पठाण, धम्मवेधा जाधव यांसह विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येत आ. तनपुरे यांना पाठींबा दिला. याप्रसंगी बाळासाहेब जाधव, निलेश जगधने, बाळासाहेब शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आ. तनपुरे यांच्या सारख्या विकासात्मक चेहर्‍याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. राहुरी परिसरात कधीही गट,तट, पक्ष न पाहता सर्वांच्या भावना जाणून घेत विकास कामे करणारे आ. तनपुरे यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत. राहुरी मतदार संघामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेत आ. तनपुरे यांनी एकात्मता जोपासली आहे. तर जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करीत तरुणांना गुन्हेगार बनविण्यात मागिल काळात कोणाचा पाठबळ होता? हे राहुरीत सर्वानी पाहिलेले आहे. सर्वांना सोबत घेऊन राहुरी परिसराचे नंदनवन करण्यासाठी आम्ही पाठींब्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. याप्रसंगी प्रस्ताविक संतोष आघाव यांनी केले. संजय साळवे, सुरेश निमसे, सुरेश म्हसे, वाय.एस. तनपुरे, नरेंद्र शिंदे, आदिनाथ तनपुरे, भास्कर आल्हाट, हरिदास जाधव, मिनाताई धाडगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here