Home क्राईम विरोधी उमेदवारांकडून नोकरीचे आमिष

विरोधी उमेदवारांकडून नोकरीचे आमिष

16
0

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांची पायाखालची वाळू सकरली असून आता ते जिल्हा बँकेचे चेरमन असल्याने प्रचार दरम्यान खाजगीमध्ये अनेक तरुणांना ते जिल्हा बँकेत नोकरीला लावून देतो असे खोटे आमिष दाखवत आहेत. मात्र तरुणांनी कर्डिलेंच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी केले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवाजीराव कर्डिले हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. जिल्हा बँकेमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाले असून नोकर भरतीमध्ये देखील मोठा घोटाळा असल्याचा संशय असुन निवडणुकीच्या तोंडावर ते तरुणांना नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवत आहेत. मात्र यात कुठलीही सत्यता नसुन तरुणांनी कर्डिले यांच्या आमिषाला अजिबात बळी पडू नये असे त्यांनी म्हटले आहे.
पराभवाच्या भितीने विरोधी उमेदवार काहीपण करण्यास मतदारांनी भुलथाप्यास बळी पडू नये.असे आवाहन आघाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here