सोनई – शिक्षण क्षेत्रात नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या स्मार्ट किड्स अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार दि.5 जानेवारी रोजी सायं 5 वाजता होत असल्याची माहिती प्राचार्य सोनल परेश लोढा यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अद्वितीय कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर , नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख, नेवासा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, सोनई पोलीस ठाण्याचे एपीआय विजय माळी, जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले आदी उपस्थित राहणार आहेत.
गत पंधरा दिवसापासून अद्वितीय कलाविष्कार कार्यक्रमाची भव्य पूर्वतयारी सुरू आहे. भव्य प्रांगण, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, पालक ग्रामस्थ प्रेक्षकांची बैठक व्यवस्था, व्यासपीठ, विद्युत रोषणाई आदींची तयारी सुरू आहे. एकास एक असा कलाविष्कार सोनईकरांना उद्या पाहायला मिळणार आहे.तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहावे असे आवाहन स्मार्ट किड्स अकॅडमीच्या वतीने करण्यात येत आहे.