Home Blog ना.विखे पाटील यांची सभा

ना.विखे पाटील यांची सभा

15
0

राहुरी शहरात माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रचार फेरीच्या निमित्ताने युवानेते अक्षय कर्डीले व कार्यकर्ते यांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या.

घरो घरी महिलांनी अतिशय उत्सहाच्या वातावरणात अक्षय कर्डीले यांचे औक्षण केले.अन् विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अक्षय कर्डीले म्हणाले महिलांनी यावेळी ठरवले आहे कि आपल्या लाडक्या भावाला कमळाचे बटन दाबून निवडून आणायचे आहे, तसेच जेष्ठ नागरिक आमच्या सोबत आहे. त्यांनी पाच वर्षे समोरच्या उमेदवारचा कारभाराला, त्रासला वैतागले असून यावेळी कर्डीले साहेबानाच निवडून आणायचं असे ठरविले आहे, तसेच तरुण मोठया प्रमाणात आमच्याकडे जोडले जात असून काही तरुणांना आमचे पोस्ट ठेवल्या व आमच्या सोबत आले म्हणून समोरचे उमेदवार व त्यांचे कुटुंबातील लोक या तरुणांना धमकी देतात घरी बोलावून दम दिला जात आहे त्यामुळे खरी दहशत कोणाची आहे हे आता नागरिकांच्या लक्षात येत आहे ही दहशत मोडून काढायचं काम येत्या 20 तारखेला राहुरीचे नागरिक कारणार आहे असेही ते म्हणाले तसेच कोणीही यांच्या धमकीला घाबरून जाण्याची गरज नाही आम्ही सर्व जण प्रत्येक तरुणांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत असे कर्डिले म्हणाले.यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे,शरद म्हसे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here