सोनई – अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श अशी शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या सोनईच्या आदर्श विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या गुरुवार दि.6 फेब्रुवारी सायं 5 वाजता आयोजित केले असल्याची माहिती मुख्याध्यापक अनिल दरंदले सर यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकामधील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळाच्या अध्यक्षा सौ.जयश्री रविराज गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळाचे सचिव रविराज तुकाराम गडाख,सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्याहस्ते होणार आहे.तरी आपण सर्वांनी चिमुकल्यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श विद्या मंदिर यांच्यावतीने करण्यात येत आहे.