पाथर्डी – तालुक्यातील शिंगवे केशव येथील रहिवासी सुदाम मच्छिद्र गाडेकर यांनी २०२० रोजी पाथर्डी तहसील कार्यालयामध्ये कुपन ऑनलाईनसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता २०२५ साल उजाडले, पाच वर्षानंतरही गाडेकर यांचे कुपन ऑनलाईन झालेले नाही त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयासमोरच अमरण उपोषण बसण्याचा इशारा दिला आहे.आपल आयुष्य पत्रकारिता,समाजकारण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला उपोषणाची वेळ येते ही दुर्दैवी बाब आहे.
पाच वर्षानंतरही पाथर्डी तहसील कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागत नाहीत. वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. तहसील कार्यालयातील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. तेव्हा सरकारी दरबारी न्याय कोणाला मागायचा व कामाची अपेक्षा कोणाकडून करायची असा संतप्त सवाल सर्व सामान्यांकडून विचारला जात आहे.
तहसील कार्यालय असो अथवा पंचायत समिती कार्यालय सर्वच ठिकाणी सर्वसामान्यांची हेळसांड आणि अडवणूक होत आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने पाच वर्षापासून विनंती आणि पाठपुरावा करूनही कुपन ऑनलाईन केलेले नाही.त्यामुळे तहसील कार्यालयासमोरच अमरण उपोषण बसण्याचा इशारा सुदाम गाडेकर यांनी दिला आहे.