Home अहमदनगर गुलाब फुलाच्या किंमतीत तिप्पट वाढ

गुलाब फुलाच्या किंमतीत तिप्पट वाढ

27
0

राहुरी : ‘व्हेलेंटाईन डे’ स्पेशल गुलाब फुल मागणीमुळे आजच्या मार्केटमध्ये किंमत वाढली आहे.

फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी युगुल ‘व्हेलेंटाईन डे’ सह ‘व्हेलेंटाईन विक’ची आतुरतेने वाट पाहतात. व्हेलेंटाईन विकच्या प्रत्येक डे एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात.आज तो डे आठवडा संपला असून, आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांजवळ आपले प्रेम व्यक्त्त करत असतात.केवळ प्रेमी युगुल नव्हे, तर हल्ली मित्रमैत्रिणी, पती-पत्नी सहजपणे व्हेलेंटाईन डे साजरा करतात. याच दिवशी आपल्या प्रियजनाला गुलाब फुल देण्याची प्रथा आहे.तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह पाहता सध्या गुलाब फुलाच्या किमतीत तिप्पट वाढ झाली आहे.

वर्षभर साधारण भाव असणाऱ्या गुलाबाला व्हेलेंटाईन डे निमित्त चांगला भाव मिळतो.म्हणून फुल उत्पादक शेतकरी याच दरम्यान फुल विक्रीसाठी राखून ठेवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here