Home अहमदनगर अनेक प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता

अनेक प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता

34
0

 

गणेश हापसे : गणराज्य न्यूज 

अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक अहिल्यानगरला घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. ही बैठक झाल्यास जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी जयंती वर्ष सुरू आहे. जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव दिल्याने ही बैठक चौंडी किंवा अहिल्यानगर शहरात व्हावी, असे प्रस्तावित असल्याचे समजते. प्रशासनातील सूत्रांनीही अशी चर्चा
प्राथमिक पातळीवर सुरु असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. अहिल्यानगर हा राज्यात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे.
सहकार, सिंचन यात हा जिल्हा आघाडीवर आहे. सहकार, सिंचन, दळणवळण, उद्योग या क्षेत्रांत जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत. जिल्हा विभाजनाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय होऊ शकलेले नाही. दक्षिण भागातील सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here